बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाद झाल्याचा राग खुर्चीवर काढला; नियमभंग केल्यानं कोहलीवर कारवाईची टांगती तलवार

चेन्नई | आयपीएलचा 6वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळण्यात आला. सनरायजर्स हैदराबाद हा सामना सहज जिंकेल अशी चिन्हे असताना कोहलीने आपली जादू चालवली. अनपेक्षितपणे शाहबाज अहमदला गोलंदाजी दिली आणि सामना अखेर सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला. पण या सामन्यात कोहलीनं केलेल्या एका चुकीमुळे आता त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूची सुरूवात चांगली झाली नाही. कोरोनातून नुकताच बरा झालेला देवदत्त पडिक्कल स्वस्तात परतला. कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. कोहली आक्रमक होऊ लागल्यावर डेव्हिड वॉर्नरने आपला हुकूमी एक्का बाहेर काढला. डेव्हिड वॉर्नरने जेस्न होल्डरकडे चेंडू सोपवला.

होल्डरने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने पुल शाॅट मारण्याचा पर्यत्न केला. पण कोहलीने फटकवलेला चेंडू विजय शंकरने आरामात पकडला. कोहलीला चांगली सुरवात भेटून देखील मोठी पारी खेळता आली नाही. त्यामुळे कोहली निराश झाला. त्याने डगआऊटकडे जात असताना चिडून डगआऊटमधली खुर्ची बॅटने उडवली. त्यावेळी संघातील इतर खेळाडू देखील कोहलीकडे पाहत होते.

दरम्यान, हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयपीएल प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली. विराट कोहलीनेही आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याचे कबूल केले. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. त्यांमुळे आता कोहलीवर कारवाई होईल की काय! अशी भिती बंगळुरूच्या चाहत्यांना वाटू लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

भावोजींच्या प्रेमापोटी मेहुणीनं आपल्या पतीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

लेडी डॉन, गर्ल्स हॉस्टेलमधून चालवायची गँग, उद्योगपतींना फोन करुन…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More