अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणारे सरकारच्या निशाण्यावर केली धडक कारवाई
नवी दिल्ली | अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या बिहारमधील 35 सोशल मीडियावरील ग्रुपवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे. 14 जून रोजी केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची माहिती दिली. यानंतर वेगवेगळ्या भागातील 11 राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या.
दरम्यान यामुळे अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 8999711259 हा क्रमांक केंद्राने व्हाॅटसप तथ्य तपासण्यासाठी जाहिर केला आहे. आंदोलनातून झालेला विरोध वाढत असल्याने बिहारच्या 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये.
या योजनाचा विरोध ठिकठिकाणी वाढत आहे. हजारोच्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. यानंतर तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान योजना मागे घेतली जाणार नसून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेश मधून या योजनेला अधिक विरोध होत आहे. याला आणखी प्रखर करण्यासाठी रविवारी बिहारच्या विद्या्र्थ्यानी भारत बंदची हाक दिली होती. यामध्ये विरोधी पक्षाचांही समावेश होता.
थोडक्यात बातम्या
‘आमदारांना सातत्याने फोन येत आहेत’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना!
‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; बिचुकलेंनी सांगितलं गणित
‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.