बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश टोपेंची महाराष्ट्राला पुन्हा एकदा गुडन्यूज…

मुंबई | कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेने पुकारलेल्या युद्धाला आता चांगलं यश येताना दिसून आहे. नवे रूग्ण जरी मिळत असले तरी आता कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या डिस्चार्जच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे.

राज्यात मंगळावारी १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंतची डिस्चार्ज दिलेल्यांची एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

म्हणजेच राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ कोरोना पेशंट ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता ५० हजार ४४ रुग्णांवर राज्यातील विविध भागांतील तसंच शहरांतील रूग्णांलयांमध्ये उपचार सुरू आहेत.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”

भारत कोरोनाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर; ‘ही’ गोष्ट ठरतेय सर्वात घातक

महत्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा धुमाकूळ… मागच्या 24 तासांत तब्बल 2 हजार लोकांचा मृत्यू!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?, ते नेमकं काय लपवत आहेत?”

भारत आणि चीनच्या सैन्यात का झाला वाद?, घटनास्थळी नेमकं काय काय घडलं???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More