मुंबई | प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रशांत दामले यांनी त्यांच्या चाहत्यांना ही बातमी दिलीये.
प्रशांत दामले यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केलेत. प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता.
फेसबूक पोस्टमध्ये प्रशांत दामले म्हणाले, “पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर मला काही प्रमाणात कणकण जाणवत होती. मला डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्यात.”
ते पुढे म्हणाले, “बुधवारी कोरोना चाचणी केली असता त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. बुधवारपासून मी 7 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. यामुळे बोरीवलीचा प्रयोग आणि गडकरी रंगायतनचा प्रयोग हे रद्द करावा लागलाय. मात्र सध्या मी ठणठणीत आहे.”
थोडक्यात बातम्या-
“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”
OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला
उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ
उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन