बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!

मुंबई | रविवारी संपुर्ण देशात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजपथपासून ते शहरं, खेडी पाडी देशभक्तीच्या वातावरणात न्हावून निघालीत. प्रत्येकाने देशाविषयीचं प्रेम व्यक्त केलं. असाच एक व्हिडीओ पाहून अभिनेता रितेश देशमुख हळहळला आणि त्या व्हिडीओमधील व्यक्तीला सॅलुट करत नेटकऱ्यांना त्याचा फोन नंबर मागितला.

संबंधित व्हिडीओमध्ये दोन पाय नसलेला तरूण एका खांबावर चढत असल्याचं दिसत आहे. या खांबावर कोणताही झेंडा नाही. पण त्याच्या शरीरावर असणाऱ्या तिरंग्यामुळे तरूण खांबाच्या टोकाला पोहोचला तेव्हा जणू तो तिरंगाच फडकत असल्यासारखा भास होतो. हा व्हिडीओ पाहून रितेशनं टविट केलं आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर मग काय? असं रितेशनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो. कुणाकडे त्याचा मोबाईल नंबर असेल, तर मला द्यावा, असं ट्विटमध्ये रितेशनं म्हटलं आहे.

दरम्यान, मी हा व्हिडीओ कालच पोस्ट केला असता, पण आज सकाळी मला तो मिळाला. पण असं प्रेरणा देणारं, स्वत:बद्दल सारखं वाईट वाटून घेणं थांबवणारं तसंच मोठी इच्छा असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा देणारं असं काहीतरी पाहण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो, असं ट्विट महिंद्रा अँड महिद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”

हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

पडद्यावरच्या खलनायकानं जिंकली जनतेची मनं

“अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More