बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

मुंबई | नुकतंच मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानं सुसाईड नोट लिहित त्याच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात अडथळा आणणाऱ्या अभिनेता साहिल खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. अशातच आता याप्रकरणी अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानला अटक करण्यात आली आहे.

अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानवर मनोजनं सुसाईड नोट लिहित अनेक आरोप केले. यामध्ये त्यानं लिहिलं होतं की, पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल करत तो सतत माझं करिअर संपवण्याची धमकी मला देत आहे.

मनोजनं केलेल्या गंभीर आरोपांमुळे साहिल खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यातच माध्यमांशी संवाद साधताना साहिलनं मनोजन केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता याप्रकऱणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, 16 सप्टेंबरला सकाळी मनोज पाटीलनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला कुपर रुग्णालयात दाखल केलं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.

थोडक्य़ात बातम्या – 

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे- उद्धव ठाकरे

गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग होण्याचा अधिक धोका- ICMR

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More