मनोरंजन

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संजय दत्तला अचानक श्वसनाचा सुरू झाला. त्यामुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला नाही.

सध्या संजय दत्तला लिलावती रुग्णालयातील नॉन कोविड आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. काही चाचण्यांचे रिपोर्ट अजून प्रलंबित असून, डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न

विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

कोल्हापुरात खासगी रुग्णालयाला सरकारी ऑडिटरचा दणका, रुग्णाच्या बिलात ‘इतक्या’ लाखांची केली कपात

“मराठा समाज आरक्षण उपसमितीवरून अशोक चव्हाण यांना हटवून या नेत्याची नियुक्ती करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या