बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनं घेतला सोशल मीडियावरून ब्रेक, पोस्ट करत दिली माहिती

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही आपल्या करिअरची सुरूवात ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमधून केली. अंकिताने या मालिकेमध्ये ‘अर्चना’ची भूमिका केली होती. तिने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे.

अंकिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. तसेच ती फोटो, व्हिडीओही वारंवार पोस्ट करत असते. अशातच तिने एक फोटो पोस्ट केला आहे.

त्यामध्ये It’s not a goodbye, it’s a see you later’ असं लिहिलं आहे. यावरून अंकिता आपल्या सोशल मीडियावरून ब्रेक घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अंकिताच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने तर ‘सुशांत सिंह राजपूत’च्या सोशल मीडियावरील पोस्टच्या एक वर्षांनंतर अंकिताने ब्रेक घेतला आहे. सुशांतने मागील वर्षी जूनला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यानंतर 14 जूनला त्याच्या मृत्यूची बातमी आली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

थोडक्यात बातम्या-

जीमचा प्रभाव पाहण्यासाठी महिलेनं काढले तसले फोटो, अन् चुकून घडला धक्कादायक प्रकार

‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी

‘मुंबई सागा’ चित्रपटात RSSची बदनामी?; चित्रपटातील ‘या’ दृष्यांवर संघाचा आक्षेप

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More