बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू तर लबाडांचा लबाड…’; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर टीका, वादग्रस्त पोस्ट चर्चेत

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येते. आपल्या सोशल मीडियावरून केतकीने अनेकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे. यावेळेस केतकीने जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.

केतकीने शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. तुका म्हणे पवारा नको उडवू तोंडाचा फवारा. ऐशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी टीका केतकीने या पोस्टमध्ये केली आहे.

सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे. समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप. ब्राम्हणांचा तुला मत्सर, कोण रे तू? तू तर मच्छर. भरला तुझा पापघडा, गप! नाहीतर होईल राडा. खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड. याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड, अशी पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी सात्याऱ्यातील एका भाषणात बोलताना कवितेच्या माध्यमातून हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने (BJP) केली होती. याच कवितेचा धागा पकडत केतकी चितळेने शरद पवारांवर टीका केली आहे. केतकी चितळेने खालच्या शब्दात शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

27 मे रोजी ‘या’ भागात मान्सूनचं आगमन, हवामान खात्याचा इशारा

महत्त्वाची बातमी ! डी गँग संदर्भात NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा

धक्कादायक ! वाढदिवसाच्या दिवशीच ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

‘या’ ठिकाणी इमारतीला भीषण आग, अनेकजण जखमी

शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More