बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

मुंबई | लॉकडाऊन असल्याने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुर-कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार होऊ लागली. अशाचच अभिनेत्री माधुरी दिक्षीत फिल्म इंडस्ट्रीतल्या कामगार आणि तंत्रज्ञांच्या मदतीला धावली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कामगार मजुरांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षितने महामंडळाला भरघोस मदत केली. माधुरीच्या मदतीमुळे कामगार, तंत्रज्ञ तसेच कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

माधुरीने यावेळी इतर कलावंतांना देखील चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन केलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी माधुरी दीक्षितचे मदतीसाठी आभार मानले आहेत.

दरम्यान, सामाजिक तसंच राजकीय संस्था, अनेक उद्योगपती, विविध क्षेत्रांत काम करणारी मंडळी, राजकारणी मंडळी तसंच चित्रपटसृष्टीत काम करणारे अनेक कलाकार यांनी आपापल्या परीने मदत केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

महत्वाच्या बातम्या-

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सूचना केल्यावर राजकारण समजत असाल तर तुम्ही गैरसमजात रहा; फडणवीसांचं उद्धव यांना प्रत्युत्तर

काही राज्यांनी वाईट वागणूक दिलीये, आता उ. प्रदेशचे कामगार हवेत तर परवानगी घ्यावी लागणार- योगी आदित्यनाथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More