बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री नोरा फतेही ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात?; ‘त्या’ व्हायरल फोटोंनी वाढवली उत्सुकता

मुंबई | आपल्या डान्सच्या अनोख्या शैलीमुळे सतत प्रकाशझोतात असलेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही (Nora Fatehi). नोरा नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत संवाद साधत असते, त्यांचं मनोरंजन करत असते. अशातच नोरा आता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

नेहमीच चर्चेत असलेली नोरा आता रिलेशनशिपच्या (Relationship) चर्चांमुळे केंद्रस्थानी आली आहे. नुकतेच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत ती रिलेशशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये नोरा प्रसिद्द गायक गुरु रंधावासोबत (Guru Randhawa) दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमधून ते गोव्याच्या बीचवर असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे नोराच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की, खरंच ते रिलेशनशिपमध्ये आहेत की या फक्त चर्चाच आहेत.

दरम्यान, सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नोरा आणि गुरु रंधावाचे फोटो शेअर केले आहेत. ते दोघे आता म्युझिक व्हिडीओसाठी एकत्र आलेत का रिलेशनशिपमध्ये आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या –

‘मोदींना धन्यवाद देण्यासाठी शेजाऱ्यांना चहा पाजा’; रावसाहेब दानवेंनी दिला अजब सल्ला

‘त्या’ गटारगंगेतून मुंबईला बाहेर काढायचंय; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

“म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

चिंताजनक! आता ‘या’ जिल्ह्यात आढळला Omicronचा पहिला रुग्ण

महाराष्ट्र कोरोना अपडेट, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More