“मी कधीच आई होऊ शकत नाही”, भर कार्यक्रमात अभिनेत्री ढसाढसा रडली
मुंबई | चाहत्यांच्या भेटीला आल्यापासून प्रसिद्ध अभिनेत्री कंगणाचा लाॅक अप शो अनेक कारणांनी गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच मुन्नवर फारूखीच्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता पायल रोहतगीने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पायलने तिच्या खाजगी आयुष्यावर बोलताना महत्त्वाचं गुपित शेअर केलं आहे. लाॅक अप शोची होस्ट म्हणून सध्या कंगणा राणावत काम करत आहे. मी आणि संग्रामने खूप प्रयत्न केले पण मी कधीच आई बनू शकत नाही, असं वक्तव्य पायलने केलं आहे.
मी आई बनण्यासाठी आयव्हीएफ देखील केला पण माझे प्रयत्न अपुरे पडले. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी प्रयत्न करत आहे, असं सांगताना पायलला आपले अश्रू आवरता आले नाहीत. मी माझ्या बाॅयफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय या गोष्टीमुळंच लांबणीवर टाकल्याचं देखील पायल म्हणाली आहे.
दरम्यान, मी आई बनू शकत नसल्यानं संग्रामला सांगितलंय की तु दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर जी तुला मुल देऊ शकेल, असंही पायल रोहतगी म्हणाली आहे. पायलचं हे बोलणं ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”
“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा
Comments are closed.