पुणे महाराष्ट्र

‘कष्टाचं चीज झालं’; कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद

पुणे | ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली.

डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींचं अखेर यश मिळालं, असं अदर पुनावाला म्हणाले.

कोरोनावरील भारताच्या पहिली लस असलेल्या कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे, असं सांगत पुनावाला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”

काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या