बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलची रंगत आणखी वाढणार; आयपीएलमध्ये 8 नाही तर आता 10 संघ खेळणार

मुंबई | क्रिकेटमध्ये टी-20 फाॅरमॅट आल्यानंतर क्रिकेटचं रंगरूपचं बदललं. गेल्या 14 वर्षात भारतात आयपीएल खूप गाजली. भारतीयांनी आयपीएलला भरभरून प्रेम दिलं. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले होते. त्यातच आता आयपीएलची रंगत वाढवण्यासाठी आयपीएलने मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या पुढील सत्रात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार आहे. बीसीसीआय यासंदर्भात लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये 8 नाही तर 10 संघ खेळणार आहेत. 2022 मध्ये येणाऱ्या या नव्या संघांसाठी मूळ किंमत दोन हजार कोटी रुपये असेल. त्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मिळते आहे. जानेवारीत अधिकाराचाही लिलाव केला जाणार आहे.

येत्या ऑक्टोबरपर्यंत नव्या संघांची  प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नव्या संघांच्या शर्यतीत अहमदाबाद, पुणे, लखनऊ आणि इंदूर सर्वांत आघाडीवर आहेत. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये आयपीएलच्या मेगा लिलावाचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघातील खेळाडूंचा नव्याने लिलाव केला जाईल. सर्व संघ 4 खेळाडू ठेवू शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट लीगचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. दरम्यान, 29 सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डनंतर आता भारतात ‘ही’ लस देखील मिळणार मोफत

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाल्यानंतर आज नेमका कोणता मुद्दा गाजणार? 

‘…पण भाजपला हे मान्य आहे का?’ मोहन भागवतांचं कौतुक करत शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुस्लिम आरक्षणासाठी आठवले मैदानात; आज आझाद मैदानात रिपाइंचा एल्गार

‘एका चेंडूत सर्वाधिक बळी घेणारे भास्कर जाधव’; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More