बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

पुणे | शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा उत्सव असणारा बैलगाडा शर्यतीचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयानं सोडवला आहे. बैला हा शेतकऱ्यांच्या दावणीला आणि दिमतीला असलेला रूबाबदार प्राणी आपण सर्व शेतकऱ्यांकडं पाहिला असेल. अनेक वर्षापासूनची बैलगाडा शर्यतीची मागणी मान्य केल्यानंतर आता राज्यात श्रेयवादाची लढाई चालू झाली आहे.

2014 साली मुंबई उच्च न्यायालयानं राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून अथक प्रयत्न करण्यात आले होते. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी अनेकदा संसदेत आवाज उठवला होता. परिणामी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली खरी पण अनेकजण आता श्रेय घेण्यासाठी पुढे येतील. पण मी मागं राहाणार आहे. श्रेय कोणाचं आहे हे जनतेनं ठरवावं, असा टोला कोल्हे यांना लगावला आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल यावेळी त्यांनी केदार यांचे आभार मानले आहेत. तर खरं श्रेय हे राज्य सरकारचं आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यात बैलगाडा शर्यती घेण्याची परंपरा आहे. पण काही काळापासून ही शर्यत बंद असल्यानं सर्व स्तरातून सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात येत होते. बैल हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

थोडक्यात बातम्या 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More