#धक्कादायक | साडेतेरा कोटी लोकांचे आधारकार्डचे तपशील सार्वजनिक

बंगळुरु |साडेतेरा कोटी नागरिकांच्या आधारकार्डचे तपशील सार्वजनिक झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. बंगळुरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटीने हा दावा केलाय.

सार्वजनिक झालेल्या आधारकार्डचे सर्वाधिक तपशील आंध्र प्रदेश राज्यातील असल्याची माहिती आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही चूक झाल्याचं सांगण्यात येतंय. धक्कादायक बाब म्हणजे ही माहिती कोणीही पाहू शकत असल्याने तिचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.