महाराष्ट्र रत्नागिरी

“महाड दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे”,मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रूपये

रायगड | महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही 5 मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काही वेळापूर्वीच मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. दुसरीकडे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबतचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, पण तो पक्ष कोणता त्याचं नाव घेणार नाही”

‘मी बिनशर्त माफी मागणार नाही’; प्रशांत भूषण निर्णयावर ठाम

देशातील ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना टाटा समूह देणार टक्कर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या