Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

रायगड | प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार निसर्ग वादळ अरबी समुद्रातून वेगाने पुढे येत असल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. याच याच पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात खबरदारी म्हणून दि. 3 जून पहाटे 2 वाजेपासून ते पुढील ४8 तास कलम 144 अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, असं पालकमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

संचारबंदीदरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच सुक्षित रहावे. शासनातर्फे वेळोवेळी सूचना मिळतील, तोवर सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील त्यांनी रायगड जिल्हावासियांना केलं आहे.

मच्छिमार बांधवांनीदेखील समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. समुद्र किनारपट्टीवरील व कच्च्या घरात स्थायिक असलेल्या नागरिकांनी गावात सुरक्षितस्थळी आपल्या परिवारासह गुरा-ढोरांनाही सोबत घेऊन जावे, त्यांना एकटे सोडू नये. गावातील नागरिकांनीसुध्दा त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचं तटकरे म्हणाल्या.

जिल्हा प्रशासनास योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. करोनासोबत दोन हात करीत असतानाच हे वादळाचे संकट उभे राहिले आहे. यालाही आपण संयम आणि धैर्याने सामोरे जाऊ. शासन आणि प्रशासन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी जिल्हावासियांना दिला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

महत्वाच्या बातम्या-

लोकांकडे पैसेच नाहीत तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण घेणार?; पृथ्वीबाबांचा मोदींना सवाल

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या