महाराष्ट्र मुंबई

“…तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल”

मुंबई | हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनी औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर  सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

महादेवावर नितांत श्रद्धा असलेल्या मुस्लिम शेतकऱ्यानं स्वखर्चातून उभारलं महादेवाचं मंदिर!

“आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”

“आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या