मुंबई | बेस्टच्या ताफ्यात 46 इलेक्ट्रिकल बस आहेत. यात 26 नवीन इलेक्ट्रिकल बस बेस्टच्या ताफ्यात आल्यामुळे 72 इलेक्ट्रिकल बस आता रस्त्यावर धावताना पाहायला मिळणार आहेत. 26 इलेक्ट्रिक बसेस गाड्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला.
मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या शहरात 26 इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. एकंदरीत 340 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई-पुणे, पुणे- कोल्हापूर, मुंबई-नागपूर या पट्ट्यांवर लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावताना पाहायला मिळतील, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
गेले दोन ते तीन वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. अवजड उद्योग खात्यात जेव्हा अनंत गीते होते, त्यानंतर अरविंद सावंत होते. तेव्हापासून याची प्रोसेस सुरू झाली होती, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”
“…म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला”
“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही”