बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्या”

मुंबई | बुधवारी राज्याचं हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू झालं आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अधिवेशनाला गैरहजर आहेत. त्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार दुसऱ्या कोणाकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना प्रसाद लाड यांनी आता ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) मानवंदना देण्यात आली. यावरून लक्षात येतं की, मुख्यमंत्री अधिवेशनाला येत नाहीत. तसेच आमचे सर्व नेते म्हणतायेत की, मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. आम्ही प्रार्थना देखील करत आहोत की, त्यांनी लवकर बर व्हावं आणि करत राहणार आहोत, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

राज्याचा कारभार गेल्या दीड महिन्यापासून अधांतरी आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही. माझं मत आहे की, मुख्यमंत्र्यांनी आराम करावा आणि मुख्यमंत्री पदाचा कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किंवा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे द्यावा, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. राज्याचा कारभार थांबला नाही पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार कोणाकडे द्यावा हा खरं तर मुख्यमंत्र्यांचाच प्रश्न आहे. परंतु, दादांचा अनुभव लक्षात घेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून टेक्निकली तो त्यांच्याकडेच द्यायला हवा, असं त्यांनी म्हटलं आहे. तीन तिघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे (NCP) द्यायचं नसेल तर निश्चितपणे त्यांनी तो आदित्य ठाकरेंकडे किंवा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे द्यावा, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं भाजप नेत्यांना कळणार नाही”

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More