‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडले. त्यानंतर आता शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आता फक्त काही आमदार आणि 6 खासदार शिल्लक आहेत. बाकी तळागाळातील शिवसैनिकांपैकी कोणी शिंदेंसोबत आहेत तर कोणी मूळ शिवसेनेशी प्रमाणिक आहेत.
आता शिवसेनेच्या या बंडखोर आमदार आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टीका केली आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांच्या फाईल्स उघडल्याने त्यांनी पक्षाविरोधात गद्दारी केली असे म्हणत आदित्य ठाकरेंनी हल्ला चढविला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी 12 खासदारांच्या पलायनावर त्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली.
घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची आणि जेव्हा प्रकरण अंगाशी येत असेल तेव्हा पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा असा आरोप त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर केला. शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभाध्यक्षांना ओम बिर्ला (Om Birla) यांना स्वाक्षऱ्यांचे पत्र देऊन त्यांच्या वेगळ्या गटाला मान्यता देण्याची विनंती केली. तसेच त्यांच्या आसनाची वेगळी व्यवस्था आणि त्याचे नेते म्हणून राहुल शेवाळे यांना मान्यता देण्याची देखील मागणी केली.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्राबाहेरील दौरे काढले. तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला जाऊन मजा करता? आणि त्याला बंड म्हणता? दिल्लीसमोर न झुकण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. तरी शिंदे हे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठी दिल्ली दौरे करुन दिल्लीच्या तक्तासमोर झुकत आहेत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…
“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”
आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार
‘पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे,आताचे सुलतान शिवसेना पाडतात’; खासदार फोडल्यानंतर सेना आक्रमक
मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका
Comments are closed.