मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडत आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा वारी करून अखेर एकनाथ शिंदे गटाचे आमदार आज विधानभवनामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना बसमधून विधानभवनात आणण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
कसाबला देखील एवढ्या बंदोबस्तात आणलं नव्हतं. मात्र त्या आमदारांना एवढ्या बंदोबस्तात आणलं गेलं. मला याचं वाईट वाटतं. अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिंदे गटावर टीका केली. विधानसभा परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. विधानभवन परीसरात येवढा कडेकोट बंदोबस्त कशाला?, असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला.
या आमदारांना पुन्हा कोणी गुवाहाटीला नेणार आहे का? अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेत एकत्र बसणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिंदे गटाच्या आमदारांना प्रतोद सुनिल प्रभु यांनी काढलेला व्हिप लागू होईल,असंही म्हटलं.
मट्रोचे आरे येथील कारशेड यावर बोलताना, आम्हाला धोका दिला आता मुंबईला धोका देऊ नका. आरे जंगल तोडू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. आरेचं जंगल मुंबईसाठी अत्यंत महत्वाचं आहे. महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजुरमार्ग, गोरेगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरु होता. या नव्या सरकारचा पहिला निर्णय मुंबईवर घाला घालणारा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
“मी सुद्धा बऱ्याचदा मुख्यमंत्री झालो पण मला कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवलेलं आठवत नाही”
मोठी बातमी! महाविकास आघाडीला आणखी एक झटका
‘…तर एकनाथ शिंदे यांनी हे आधीच केलं असतं’; जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी
‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य
“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”
Comments are closed.