बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमपीएससी परीक्षेबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले… 

मुंबई | स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज घडली. स्वप्नील लोणकर  एमपीएससी परीक्षेत 2 वेळा उत्तीर्ण झालेला असतानाही नोकरी मिळाली नसल्याने नैराश्यात जाऊन त्याने हा निर्णय घेतला. यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूतोवाच केलं आहे.

दरम्यान, स्वप्नील लोणकर या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याने विरोधी पक्षातर्फे ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही आत्महत्या नव्हे तर सरकारने केलेला खून आहे, असं म्हणत सरकारला धारेवर धरलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात बोलताना म्हटले आहे की, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सर्वच विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. तसेच एमपीएससीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त करत एमपीएससीला स्वातंत्र्य हवेच पण स्वैराचार नको, अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर नेमकी काय चर्चा होणार आणि त्यातून नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More