बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

सिंधुदुर्ग | गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi) शाब्दिक चकमक होत असलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. आघाडी सरकावर भाजपनं (BJP) तर आरोपांचा कलगितुराच लावल्याचं दिसत आहे.

सिंधुदुर्ग येथे बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी भाजपच्या मैत्रीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपकडून सातत्याने अन्यायाची वागणूक येतेय. जर आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यामुळे त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारविरोधात राजकीय षडयंत्र सुरू आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशात यशस्वी ठरतोय. आम्ही एकमेकांविरोधात लढलोय त्यामुळे काही प्रमाणात नाराजी असणं स्वाभाविक आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर

“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”

“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”

महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More