Top News विधानसभा निवडणूक 2019

फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर मातोश्रीबाहेर पोस्टर; मी बाळासाहेबांचा नातू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…

मुंबई |  महाराष्ट्र विधानसभेचा मुदत आता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे फ्लेक्स लागले आहेत.  मी बाळासाहेबांचा नातू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा आशय त्या फ्लेक्सवर छापला आहे.

लोकसभेवेळी मुख्यमंत्रिपदावरून चर्चा होऊन देखील आता भाजपवाले खोटं बोलत आहेत. या खोटं बोलणाऱ्यांसोबत आता आम्हाला चर्चा करायची नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीने आपली भूमिका आणखी स्पष्ट केलेली नाहीये. आमचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या