Top News महाराष्ट्र मुंबई

‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश

मुंबई | मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यातील कांदळवन राखीव वन म्हणून अधिसूचित करण्याबाबत तसेच या जमिनीवरील हरकती व दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करून कांदळवनाची राखीव वन म्हणून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करा, असे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

कांदळवन अधिसूचित करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राखीव वन म्हणून अधिसूचित झालेल्या कांदळवनातील हरकती व दाव्यांची चौकशी 15 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच महसूल विभागाच्या ताब्यात असलेले राखीव वन तातडीने वन विभागास हस्तांतरीत करण्याचे आदेशही आदित्य ठाकरे यांनी दिले.

अधिसूचित व हस्तांतरित कांदळवन क्षेत्राचे आकड्यांचे ताळमेळ महसूल व वन विभागाने करून घेण्यास सांगितले. बैठकीत वन विभागास हस्तांतरित केलेल्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या