बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल”

मुंबई | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल हाती आले. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने आपलं वर्चस्व निर्माण केलं तर उर्वरीत चार राज्यात भाजपने मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालं. चार राज्यात भाजपने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण रंगायला सुरूवात झाली. (Assembly Election Result 2022)

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना (Shivsena) संपूर्ण ताकदीने उतरली होती. मात्र, दोन्ही राज्यात शिवसेनेचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या दोन राज्यातील निकालावरून शिवसेनेवर टीका केली जात आहे. यादरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रचारासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्वत: गोवा आणि उत्तर प्रदेशात गेले होते. मात्र, सेनेला या राज्यात खातंही उघडता आलं नाही. यावर बोलताना ही तर फक्त सुरूवात आहे. आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, जे या निवडणुकीत लढले त्यांचंही आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केलं. हिमतीने, ताकदीने लढले, मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे निकाल आहेत ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. मात्र, आमचा जोश आणखी वाढलेला आहे कारण पहिल्यांदात आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने तिथे लढलो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…

2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

“जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More