भाजपसाठी नेशन फर्स्ट नाही तर इलेक्शन फर्स्ट, आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई | भाजपसाठी नेशन फर्स्ट नाही तर इलेक्शन फर्स्ट आहे, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केलीय. ट्विटरवरून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणून एका पक्षानं सुधारणा केल्या आहेत. त्याचा लोकांच्या हिताशी काही संबंध नाही. त्यांच्यासाठी नेशन फर्स्ट नाही तर इलेक्शन फर्स्ट आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुजरात निवडणूक प्रचारात जीएसटीमुळे सर्वसामान्य लोकांना होणाऱ्या त्रासावर टीका झाली होती. त्याची दखल घेऊन अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली.