बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! वृद्ध महिलेच्या गळणाऱ्या झोपडीसाठी सरसावले पोलिस

नागपूर | कोरोनाकाळात भरपूर लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटकाळात काही ठिकाणी माणुसकी संपली असं दिसतानाच बऱ्याच ठिकाणी खाकीतल्या माणुसकीचं दर्शन घडून आलं. अशातच नागपूरमधील एका घटनेनं खाकी वर्दीतल्या माणुसकीचं पून्हा नव्यानं दर्शन घडवून आणलं आहे.

नागपूरमधील शांती नगर भागातील एका वृद्ध महिलेलेच्या गळणाऱ्या झोपडीवर पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी स्वखर्चातून ताडपत्री टाकली. कोरोनाचं संकट आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना मदतीसाठी धावून आलेल्या पोलिसांमुळं वृद्ध आजीच्या डोळ्यात अश्रू तरळले. सध्या मतानी यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचं कौतुक होत आहे.

नर्मदा बबन बावनकुळे या वृद्ध महिलेची कहाणी ऐकून मतानी यांनी लगेच सोबत असलेल्या आपल्या सहकारी पोलिस मित्रांना ताडपत्री आणण्यास सांगितलं. तसंच, त्यांनी स्वखर्चानं ताडपत्रीची व्यवस्था केली. एवढ्यावरच मतानी थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः ताडपत्री तिच्या झोपडीवर टाकून दिली.

दरम्यान, पोलिस उपायुक्त मतानी हे शहरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करीत होते. शांती नगरात आपल्या ताफ्यासह पायी पेट्रोलिंग करत असताना ते व त्यांचे सहकारी एका झोपडीजवळ थांबले. पाऊस सुरू असल्याने त्यांनी आत डोकावून पाहिलं तर नर्मदा बबन बावनकुळे या 70 वर्षीय आजी त्यांना आत भिजताना दिसल्या. त्यांनी सहज चौकशी केली तर घरात मी एकटीच राहते. 40 वर्षांपूर्वी पतीचे निधन झालं, दोन मुलंही मरण पावली, असं या महिलेनं सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं- नितेश राणे

सीबीएसई बोर्डाच्या मार्किंग पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

“अनलॉक केलं असलं तरी, निष्काळजीपणा अजिबात नको”

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More