बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह! तोंडावर सात टाके, तरी देखील भारतीय बॉक्सर लढला; झुंजारपणाचं सर्वत्र कौतुक

नवी दिल्ली | सध्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वच भारतीय खेळाडू आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतीय झेंडा सर्वोच्च फडकला जावा यासाठी प्रत्येक भारतीय स्पर्धक प्रयत्न करत आहे. भारतीय बॉक्सर सतीश कुमार याने देखील भारताच्या शिरपेचात सुवर्ण तुरा लागावा, यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. मात्र, त्याला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्कारावा लागला आहे.

उपांत्यपूर्व फेरीत उतरण्यापूर्वी सतीशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर तब्बल सात टाके पडले होते. मात्र, तरिही सतिशने रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. सतीशची ही लढत जगातील अव्वल क्रमांकाच्या बाखेदीर जालोलोवला याच्यासोबत झाली. तोंडाला टाके असताना देखील सतीशने या फेरीत उत्तम खेळी खेळली. मात्र, त्याला पराभव पत्करावा लागला.

सतीशच्या पराभवानंतर देखील त्याच्या या झुंजार वृत्तीमुळे जगभरातून सतीशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सतीशने सामना जरी गमावला असला तरी देखील त्याने सर्व भारतीयांचं ह्रद्य जिंकलं आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्याच्या झुंजारपणाला सलाम करत आहेत.

दरम्यान, बाखेदीर जालोलोवला याने 5-0 असा सतीशचा पराभव केला आहे. ऑलिम्पिकमध्ये सुपर हेवीवेट प्रकारात भारताकडून प्रथमच स्पर्धक उतरला होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत सतीशला गंभीर ईजा झाल्याने अखेरच्या क्षणी वैद्यकीय पथकाने त्याला हिरवा कंदील दाखवत खेळण्यास मनाई केली.

थोडक्यात बातम्या –

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला किस अन्…

“आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की…”

“पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोष देणं कधी थांबवणार?”

“गोपीनाथ मुंडे आणि महाजनांच्या काळातील भाजप आता उरलेला नाही”

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्या शिवाय राहणार नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More