बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कुस्तीपटू प्रिया मलिकने पटकावलं सुवर्णपदक

हंगेरी | जागतिक कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. प्रियानं 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे. हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकनं सुवर्णपदक मिळवलं आहे.

या मोठ्या विजयाचं श्रेय प्रियानं तिचे कोच अंशु मलिक यांना दिलं आहे. या विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, असं प्रियानं म्हटलं. हंगेरीच्या बूडापेस्टमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर विजयी जल्लोश करतानाचा प्रियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर प्रियाचं भरभरुन कौतुक होताना दिसतंय.

प्रियाच्या या दमदार कामगिरीनंतर तिच्या प्रशिक्षकांनी आगामी ऑलिम्पिकमध्ये ती देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलं की, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिंच अभिनंदन.”

दरम्यान, प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला 5-0 ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

थोडक्यात बातम्या –

“माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं”

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More