Top News मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी भाजपकडून ‘या’ परदेशी महिलेच्या चौकशीची केली मागणी

मुंबई | सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. यातच आता सुझान वॉकर या परदेशी थेरपिस्टचं नाव समोर आलं आहे. ‘त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचा निष्कर्ष काढला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. वॉकर यांनी माहिती कायद्याचं उल्लंघन करत सुशांतची माहिती मीडियाकडे उघड का केली? त्यांनी असं कोणाच्या सांगण्यावरून केलं असे सवाल शेलार यांनी उपस्थित केलाय. परदेशी असताना भारतामध्ये मेंटल हेल्थ संदर्भात प्रॅक्टिस करण्याची परवानगी वॉकर यांच्याकडे आहे का, असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केलाय.

पोलीस, सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागाने वॉकर यांची चौकशी करण्याचे गरजेचं असल्याचं शेलार यांचं म्हणणं आहे. वॉकर यांनी मेंटल हेल्थ कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी अॅड. आशिष शेलार यांनी या पत्राद्वारे केलीये.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, रियाचे वडील, आई, भाऊ, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा ‘शॉक’, एका महिन्याचं बिल तब्बल…..

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या