बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांच्या आदेशानंतरही महाविद्यालयं उघडली नाहीत, कारण…

पुणे | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विद्यापीठाकडून लेखी आदेश न आल्याने 12 तारखेला पुण्यातील महाविद्यालये उघडली नाहीत, त्यामुळे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उदय सामंत यांना विश्वासात न घेता महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेतला का?, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये निर्णय घेताना सुसूत्रता नसल्याचं यानिमित्ताने दिसून आलं आहे.

महाविद्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देखील दिली होती, मात्र हा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गेला नव्हता, त्यामुळे महाविद्यालयांनी कामकाज सुरु करण्यास नकार दिला.

महाविद्यालये ज्यांच्या आखत्यारित्या येतात ते म्हणजेच उदय सामंत लेखी आदेश देत नाहीत, तो पर्यंत महाविद्यालये उघडणार नसल्याचं महाविद्यालयांनी म्हटलं आहे, तसेच अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा उदय सामंत यांचे आदेश न आल्याने अजित पवारांनी उदय सामंतांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, 8 तारखेला अजित पवार यांनी पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयं 11 तारखेपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यामुळे महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख बदलण्याची घोषणा करत 12 तारखेला महाविद्यालये सुरु होतील, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे, मात्र त्यानंतरही 12 तारखेला महाविद्यालयं सुरु झाल्याचं दिसून आलं नाही.

थोडक्यात बातम्या-

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More