बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समांथासोबतच्या घटस्फोटानंतर नागाचैतन्य पोस्ट करत चाहत्यांना म्हणाला…

मुंबई | दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता नागाचैतन्य आणि अभिनेत्री समंथा ओळखले जातात. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत होत. अशातच आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नागचैतन्य आणि समंथाने घटस्फोट घेतला आहे.

घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं असताना त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी अधिकृतरित्या पोस्ट शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नागाचैतन्यने त्यांच्या हितचिंतकांसाठी संदेश दिला आहे. यामध्ये समांथा आणि आपण मिळून नीट विचार करून पती पत्नीच्या नात्यातून बाहेर येण्याचा निर्णय घेतला असल्याचं नागाचैतन्यने लिहिलं आहे. तसेच गेल्या 8 वर्षांपासून दोघे चांगले मित्र मैत्रिणी असल्याचं देखील यामध्ये लिहिलं आहे. या कठीण काळात चाहते आणि माध्यमांनी आपल्याला साथ द्यावी अशी मागणी देखील त्याने केली आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात लोकांची आवडती जोडी विभक्त होत असल्याने अनेकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. समंथा आणि नागाचैतन्य या दोघांनी 2016 साली लग्नगाठ बांधली होती. मात्र सततच्या वादाला कंटाळून दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जिगरबाज! दोन चेंडूवर मिळाली स्ट्राईक, तरीही पठ्ठ्याने गगनचुंबी षटकार ठोकत केलं शतक, पाहा व्हिडीओ

रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारे लेखक द. मा. मिरासदार काळाच्या पडद्याआड!

ऐकावं ते नवलच! पोपटाची विद्यार्थ्यासोबत मैत्री, सोशल मीडियावर अनोख्या मैत्रीची तुफान चर्चा

‘तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो…’; ऑडिओ क्लिपबाबत रामदाम कदम यांची पहिली प्रतिक्रिया!

‘या’ चार गोष्टी असतील तरच देशाचा विकास होऊ शकतो- नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More