बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

नाशिक | सध्या रब्बी हंगामातील पेरण्या चालू आहेत. आपल्याकडे भावबंदकीमुळे शेताच्या वाटण्या झाल्यामुळे कमी क्षेत्रात शेती केली जाते. मात्र या ठिकाणी पेरणीसाठी ट्रॅक्टर नेणं अवघड होतं. याचा त्रास शेतकऱ्याला होतो. त्यामुळे बैल आणि पेरणीयंत्र नेण्यासाठी कसरत करावी लागते. हा त्रास लक्षात घेत एका शेतकरी पुत्राने घरीच पेरणी यंत्र बनवलं आहे.

मालेगावमधील देवारपाडयाच्या कमलेश घुमरे या युवा शेतकऱ्याने अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी पेरणी यंत्र तयार केलं आहे. कमी किंमतीत हलक्या वजनाच्या या यंत्राने कपाशी, मक, भुईमूग आणि आदी पिकांची सहज लागवड करता येणार आहे.

या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट ,वेळ तर वाचणार आहे मात्र मजूर टंचाईवर मात करता येणार असल्याचे कमलेशने सांगितलं आहे. पाईप, वायर, पाण्याची रिकामी बॉटल याचा वापर करुन हे यंत्र बनवलं आहे. कमलेश घुमरे यांनी बनवलेल्या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना शेतात टोकण करताना वाकून काम करावं लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचणार आहे. या पेरणी यंत्राद्वारे शेतकऱ्यांचं कष्ट वाचणार आहे.

दरम्यान, कमलेशने बनवलेलं यंत्र हा शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं असून या यंत्रामुळे पेरणी करतानाचे कष्ट कमी होणार आहे. या यंत्रामुळं वेळ ,पैसे ही वाचणार असल्याने आम्ही ही या यंत्राचा वापर करणार असल्याचे शेतकरी नाना सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More