गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक
मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडे वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भुमिका साकारत आहे. यादरम्यान ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय आहे. तीच्या सोशल मीडियावरुन ती आपल्या चाहत्यांना तीच्या कामाचे अपडेट्स देत राहते. एवढचं नाही तर आज आलिया भट्टचा वाढदिवस आहे आणि यातच तीने काल तीच्या सोशल मीडियावर ‘आरआर’ चित्रपटातील चर्चेत असलेला सीताच्या लुकची हलकीशी झलक दिली होती. आलीयाने तीच्या या लुकची झलक शेअर करत संपुर्ण लुक उद्या शेअर करणार असल्याचा ईशारा देखील तीने दिला होता.
दिलेल्या ईशाऱ्यानंतर आलियाने आज तीच्या सीता भुमिकेतील संपुर्ण लुक शेअर केला आहे. आलिया भट्ट हीने एसएस राजमौलाच्या चित्रपटाद्वारे नुकतचं तेळगु इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. एसएसच्या ‘बाहुबली’ या प्रचंड गाजलेल्या चित्रपटानंतर आता एसएस ‘आरआर’ नावाचा चित्रपट लवकरच लोकांच्या भेटीसाठी आणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर पासून हा चित्रपट प्रचंड चर्चेत आलेला आहे. या चित्रपटामध्ये आलिया सोबत प्रसिद्ध तेलगु अभिनेते ज्यूनिअर एनटीआर आणि राम चरण हे दोघे दिसणार आहेत.
आरआर हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला घोषणेनंतर तमिळ, मलायम आणि कन्नडच्या थिएट्रीकल राईट्ससाठी तब्बल 348 कोटांची ऑफर आली आहे. या चित्रपटाची रंगलेली चर्चा पाहून हा चित्रपट भारतात प्रचंड घुमाकुळ घलणार असल्याचा अंदाज लोक लावत आहेत. एवढचं नाही या चित्रपटात बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण देखील दिसणार आहे.
दरम्यान, ‘आरआर’ या चित्रपटात आलिया भट्ट सीताची भुमिका साकारणार आहे. तीच्या या लुकची झलक पाहण्यासाठी तीची तसेच आता तेळगु चाहते देखील उत्सुक होते. मात्र तीने शेअर केलेल्या त्या लुकच्या झलकनंतर आता संपुर्ण लुकच्या फोटोने सोशल मीडियावर प्रचंड धमाकुळ घातला आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!
‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप
बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड
Comments are closed.