बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली | पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. काही लोक दहशतवादाचं जाहीर समर्थन करत असून ही चिंतेची बाब असल्याचं मोदींनी म्हटलंय.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज पुलवामा हल्ल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं. पुलवामा हल्ला आणि त्या हल्ल्यात वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते. ही गोष्ट देश विसरणार नाही.”

“काही लोक पुलवामा हल्ल्यात देखील आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यावेळी त्यांनी केलेली विधानं आणि राजकारण संपूर्ण देश विसरू शकत नाहीये. देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलंय.

“माझ्या मनात वीर जवान शहीद झाल्याची जखम होती. मात्र काही दिवसांपूर्वी शेजारच्या देशातील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्विकारण्यात आलं त्यानंतर या लोकांचा खरा चेहरा देशासमोर आला आहे,” असंही मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

सर्व सामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण करू नका; गृहमंत्र्यांचे आवाहन

“हिंमत असेल तर अनाधिकृत हॉटेलं तोडून दाखवा”

मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More