बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंनंतर अमित ठाकरेही नाशकात दाखल; मोठी जबाबदारी देण्याची शक्यता

नाशिक | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे शुक्रवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यातच आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ सुपुत्र अमित ठाकरे यांनीही नाशिक गाठल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आज सकाळी अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि मनसेचे इतर पदाधिकारी सुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे हे देखील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. काल मनविसेला मोठा धक्का बसला आहे. आदित्य शिरोडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता मनविसेचे अमित ठाकरे यांच्याकडे मनविसेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आदित्य शिरोडकर यांना पक्षात सामिल करून शिवसेनेने नविन खेळी रचल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आगमी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीआधी मनसेला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असेल. तर दुसरीकडे 5 वर्ष सत्तेत असलेली नाशिक महानगरपालिका पुन्हा मिळवण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही नाशिकमध्ये असल्यानं त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. येत्या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भाजप मनसे युती होणार का यावर चर्चा होऊ शकते. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असा सल्ला देखील प्रविण दरेकर यांनी मनसेला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

आपल्या हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा- विजय वडेट्टीवार

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण कोण? चंद्रकात पाटलांनी केला ‘या’ मोठ्या नावांचा खुलासा

‘या’ तारखेपासून विद्यापीठ, कॉलेज सुरु करा; यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी

“6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, केंद्राचं महागाई वाढवण्याचं धोरण”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More