बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कमी पडली”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष संकटाचा सामना करताना दिसत आहे. गेल्या 7 वर्षात काँग्रेसने केंद्रातील सरकार तसेच अनेक राज्यातील सरकारे गमावली आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मदतीने काँग्रेस सत्तेत आहे. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या संघटनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.

राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कमी पडली. काँग्रेसकडे कुशल नेतृत्व आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नोटबंदी आणि कोरोना काळात केंद्र सरकारला सावध केलं होतं. मात्र त्यांची खिल्ली उडवली गेली. काँग्रेसकडे नेतृत्व आहे. फक्त गेल्या काही वर्षात आम्ही संघटनात्मक पातळीवर कमी पडलो, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. पण आम्ही केलेल्या विकासाचा प्रचार करण्यास कमी पडलो, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 7 वर्षात देशाला चुकीचं नेतृत्व मिळालं. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहे, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, पूराच्या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र वगळता इतर राज्यांना भेटी दिल्या. कोरोना काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव केला, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे. तर राज्यातील समान विकासासाठी नद्या जोड प्रकल्प भर दिला जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार

रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More