‘मला केंद्राची सुरक्षा आहे त्यामुळे…’; ‘त्या’ पत्रावर नवनीत राणांची प्रतिक्रिया
अमरावती | भाजप (BJP) खासदार नवनीत राणा(Navneet Rana) या नेहमीच चर्चेत असतात. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेऊन ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे भाजप सरकारकडून राणांवर केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. त्यातच आता नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे.
काही संशयास्पद व्यक्ती राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत(Amravati) आले आहेत. ते तुमच्या घरी देखील येऊ शकतात. तुमच्या जीवाला धोका आहे. अल्ल्हाकडे तुमच्या सुखरूपतेची प्रार्थना करतो. तुम्हाला काहिही होऊ नये, अशी माहिती राणा यांच्या एका हितचिंतकाने एका पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे आता अमरावतीत चिंतेचे सावट पसरले आहे.
मॅडम मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी एक सरकारी कर्मचारी आहे. तुम्ही माझी खूप मदत केली आहे. तुमच्या जीवाला धोका आहे. संशयित व्यक्ती तुमच्या घरी देखील येऊन गेले असतील. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. असेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, नवनीत राणा म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपूर्वी अवरावतीत उमेश कोल्हे या मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या व्यक्तीची हत्या झाली होती. भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी पोस्ट टाकली होती. या संबधी केंद्राकडून चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती, तेव्हापासून मला अशा धमक्या येत आहेत, मला केंद्राची सुरक्षा असून मी अतिरीक्त सुरक्षेची मागणी करणार नाही.
थोडक्यात बातम्या-
‘आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही’,अजित पवारांचा शिंदे सरकारवर प्रहार
‘…त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्यासारखं काही नाही’ -संजय राऊत
“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”
‘अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा’, गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी
RBI च्या गव्हर्नरला महिन्याला मिळतात ‘इतके’ लाख, मानधन वाचून थक्क व्हाल
Comments are closed.