बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

पुणे | पुण्यातील धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार याची एकच चर्चा रंगली होती. अखेर रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक हिंट दिली आहे. ज्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर नुकतंच त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये जय महाराष्ट्र लिहून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचं सांगितलं. मनसे नेेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर जोरदार आरोप केले होते.

रुपाली पाटील ठोंबरे मनसेला राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याची एकच चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. त्या शिवसेनेत जातील असा कयास अनेकांनी बांधला होता, तसेच त्यांची गेल्या काही दिवसांतील भूमिका पाहता त्या राष्ट्रवादीत जातील, असं काही जाणकारांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील ठोंबरे यांनी यावर अद्याप आपला पत्ता उघड केलेला नाही.

दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हिंट दिली आहे. चाणाक्ष लोकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटू शकलेली नाही, त्यांनी आपल्या ट्विटर हँडलचं यूझरनेम बदललं असून ते @RupaliSpeaks केलं आहे. ट्विटर हँडलमध्ये Speaks वापरणं ही राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्त्यांची खासियत मानली जाते. तोच स्पीक्स शब्द आता ठोंबरेंच्या यूझरनेममध्ये पहायला मिळत आहे. दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुपाली पाटील ठोंबरे यांचा पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“केंद्र सरकार न्यायालयाला खोटं बोलतंय की संसदेला?”

न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी”

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More