बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, म्हणाले….

मुंंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे मंंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राठोडांनी आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली.

मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. विरोधी पक्षानं अतिशय घाणेरडं राजकारण केलं. मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समाजाची बदनामी केली गेली. निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशीच माझी मागणी असून मुख्यमंत्र्यांकडे मी अशीच मागणी केली. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे आमदारकीचा नाही. ज्या पद्धतीनं राजकारण केलं केलं ते लोकशाहीच्याविरोधात आहे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे. अधिवेशन बंद पाडण्याची भाषा अपमानजनक आहे. कोणत्याही प्रकरणाची चौकशी आधी व्हायला पाहिजे, असंही संजय राठोड म्हणाले.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे भाजपच्या विरोधानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आहे. राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, अठरा दिवस पुरावे नष्ट करण्यासाठी दिल्यानंतर संजय राठोड याने दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृत पणाचा बुरखा फाडून गेला आहे. आता FIR दाखल करून त्याला तात्काळ अटक करा, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

सर्वात मोठी बातमी, अखेर संजय राठोडांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या!

संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More