बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक; दिला गंभीर इशारा

मुंबई | शिवसेनेकडून संजय पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच संभाजीराजेंना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा संघटनांनी सरकारला गंभीर इशारा दिलाय.

मराठा समाज, बहुजनांचं मत पाहिजे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा, अन्यथा पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा दाखवेल, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या दाबाव तंत्राला आम्ही घाबरत नाही. संभाजी महाराजांच्या राज्यसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जलावजुळव झाली आहे. 5 ते 6 मतांची कमी असल्याने त्याची जुळवाजुळव चालू आहे, असं ते म्हणालेत.

राज्यसभेच्या 6 व्या जागेच्या बाबतीत नाक खुपसू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजेंच्या उमेदवारीबाबत पॉजिटिव्ह आहेत. संजय राऊत तुम्हाला किमंत चुकवावी लागेल, असं छावा संघनेचे धनंजय जाधव म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

प्रेयसीसोबत सेक्स करताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, तपासातून धक्कादायक माहिती समोर

औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला- पंकजा मुंडे

‘…तर आताच राजीनामा देतो’; उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”

ओबीसी आरक्षणाबाबत दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More