बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी केलं असं काही की….

मुंबई | 2 सप्टेंबर रोजी अभिनेता तसेच ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं सर्वांच्या मनाला सुन्न करुन टाकलं. बिग बाॅसमधये असताना सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिलची जोडी लोकांच्या प्रचंड पसंतीस आली होती. एवढंच नाही तर शहनाज सिद्धार्थ शिवाय एक मिनिटसु्द्धा राहू शकत नव्हती हे लोकांच्या नजरेस आलं.

सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजला मोठा धक्का बसला आहे. तिची प्रकृती देखील खराब झाली आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेता आणि बिग बाॅस फेम अभिनव शुक्लाने शहनाजला भेट दिली होती. यावेळी ती हळूहळू नीट होत असल्याचं अभिनवने सांगितलं होतं

शहनाजच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शहनाजच्या वडिलांनी युक्ती लढवली आहे. यावेळी शहनाजच्या वडिलांनी त्यांच्या हातावर शहनाजचं नावाचं टॅटू रेखाटलं आहे. यामध्ये त्यांनी हात जोडलेले आहेत. तसेच खाली गुलाबाचं फुल देखील काढलं आहे. अर्थातच जोडलेल्या हातांच्या आणि गुलाबाच्या फुलाच्यामध्ये शहनाज नाव लिहिलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज कोणासोबतही बोलत नसून ती जेवणही करत नाही. तसेच सिद्धार्थने तिच्या हातावर जीव सोडल्याने तिला मोठा धक्का बसला आहे. याबाबत तिच्या वडिलांशी बोलताना त्याने माझ्या हातात जीव सोडला, मी कस जगू, असं शहनाजने म्हटलं आहे.

पाहा टॅटू-

 

 

थोडक्यात बातम्या-

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

उंची वाढवण्याच्या नादात आईने लेकीला दिली आयुष्यभराची शिक्षा!

“Work From Home बंद करा नाहीतर आमचा संसार मोडेल”

…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशद्रोही म्हणणार का?- रघुराम राजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More