बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर…; हर्ष गोयंका यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ

मुंबई |  सध्या सर्वत्र कोरोना लस दिली जातं आहे. कोरोना लशीचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. दरम्यान, याच कालावधीत कोरोना लशीशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. बिझनेसमॅन हर्ष गोयंका यांनीदेखील असाच एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हर्ष गोयंका यांनी दोन महिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका स्टेजवर या दोन्ही महिला गात आहेत. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. हसून हसून पोट दुखेल आणि हसता हसता रडालदेखील, असं या व्हिडीओत नेमकं आहे तर काय ते तुम्हीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता दोन महिला कलाकार स्टेजवर गात आहेत. दोघी एकत्र बसून गात आहे. गाताना दोघांमधील जोषदेखील पाहण्या सारखा आहे. इतक्या जोषात ते गातात की जणू काही त्यांना कशाशीच शुद्ध राहिली नाही. हर्ष गोएंका यांनी हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला तसंच मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर…, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, लशीचा असा परिणाम प्रत्येकाला आवडला आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लशीचे दुष्परिणाम, भांग का नशा जोगिरा सा रा रा अशा कमेंट नेटिझन्सनी यावर दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

…तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?- रूपाली चाकणकर

“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”

“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”

“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More