बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटानंतर आता राकेश झुनझुनवालांना मिळाले पंख, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध एअर इंडिया पुन्हा टाटा सन्स समूहाने त्यांच्या ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता भारताला आणखी एक एअरलाईन्स लाभणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही एअरलाईन्स प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांची ‘आकासा’ एअरलाईन्स अशी आहे.

‘आकासा’ एअरलाईन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी मिळाली आहे. जर सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडल्या तर एप्रिल 2022मध्ये ‘आकासा’ स्वस्त दरात सुविधा उपलब्ध करेल, असं कंपनीने म्हटलं आहे.

सध्या बहुतांश विमान कंपन्या तोट्यात आहेत. अशातच राकेश झुनझुनवाला यांनी ‘आकासा’ एअरलाईन्स लाँच करण्यामागे एक विशिष्ट कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आकासामुळे प्रवाश्यांना स्वस्त आणि आरामदायी प्रवास मिळेल, असं आश्वासन कंपनीने त्यांच्या वेबसाईटवरुन दिलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे विमान अगदी लहान विमानतळावरही लँड होऊ शकतं.

दरम्यान, ‘आकासा’ लाँच करण्यापुर्वी राकेश झुनझुनवालांनी अनेक खासगी विमान कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच अनेक तज्ज्ञांची देखील मतं घेतली आहे. हे विमान एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ या नावाने काम करेल. त्याचप्रमाणे प्रवाश्यांना वेगवेगळ्या मार्गावर प्रवास करता येईल, असा दावा देखील या कंपनीने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; होणार ‘हा’ मोठा फायदा, वाचा सविस्तर

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला; ‘ही’ असणार नवी नियमावली

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

सरकार ‘या’ कर्मचाऱ्यांना देणार पदोन्नती; पगारातही होणार घसघशीत वाढ

नरेंद्र मोदींचा नवीन मास्टर प्लॅन; उद्या लाँच करणार ‘ही’ जबरदस्त योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More