Top News देश

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा- राहुल गांधी

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मित्रांच्या कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या पैशांवर मोदी सरकारचा डोळा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहूल गांधी म्हणाले की, “सुटा-बुटातील आपल्या मित्रांचे 8,75,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्यानंतर आता मोदी सरकारने अन्नदात्यांचा पैसा बळकवण्यास सुरुवात केली आहे.”

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत, केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. जोपर्यंत नवीन कृषी कायदे रद्द केलं जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही, असं आश्वासन राहुल गांधींकडून देण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे

“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या