बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

नवी दिल्ली | प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध आणि प्रेम प्रकरणात वाद झाल्याने पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा गुन्हे दाखल झालेेले आपण पाहिले असतील. अशाच प्रकारे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये तरूण-तरूणीचा वाद हा पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला. स्टेशनमध्ये संबंधित तरूण पोलिसांना आपण हिच्यासोबत जाणार नाही कारण ही खूप मारत असल्याचं सांगत होता. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.

संबंधित कपल हे गेली पाच वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याआधी ते दिल्लीतही रहात होते तर गेल्या 1 वर्षापासून ते डुडा कॉलनीमध्य राहत आहेत. हा तरूण अंबरजंग येथील रहिवासी आहे. तरूणाच्या काही वडिलांनी तरूणी माझ्या मुलाला त्रास देत असून मुलाला मारते आणि डांबून ठेवत मारहाण करत असल्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना पोलीस स्थानकामध्ये नेलं.

साहेब, मी हिच्यासोबत घरी जाणार नाही. ही मला खूप मारहाण करते, सतत भांडणं करते, अशी तक्रार तरूणीने पोलिसांना दिली होता. तर दुसरीकडे तरूणीने पोलिसांना धक्का बुक्की करत इन्स्पेक्टरकडील रिल्व्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या प्रियकराला ती फरफटत घेऊन जाऊ लागली.

दरम्यान, काही वेळानंतर वडिल, तरूणी आणि तरूण यांनी समजून घेतलं. त्यानंतर तरूणही तरूणीसोबत राहायला तयारा झाला.

थोडक्यात बातम्या- 

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत WHOचा सावधानतेचा इशारा!

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतले शुक्राचार्य”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More