बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे- उद्धव ठाकरे

औरंगाबाद | देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही संस्थान भारतात विलीन झाली नव्हती. देशातील मोठ्या संस्थानापैकी हैद्राबाद संस्थान एक होतं. हैद्राबाद संस्थानावर निजामचं राज्य होतं. परिणामी या संस्थानाला विलीन करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढा भारताच्या इतिहासात अजरामर झाला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मराठवाड्यातील क्रांतीकारकांच्या त्यागाने मराठवाडा स्वातंत्र झाला. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मराठवाड्यावर झालेल्या अन्यायावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आलं, यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली आहेत.

मराठवाडा स्वतंत्र झाला मुक्तीसंग्रामाचा लढा यशस्वी झाला आहे. मुक्तीसंग्रामाची लढाई आपण जिंकली आहे. आता आपल्याला कोरोनाची लढाई जिंकायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुक्तीसंग्रामातील मराठवाड्याच्या योगदानाचा विसर महाराष्ट्राला कधीच पडला नाही. मराठवाड्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी कोरोना मुक्तीचा संकल्प केला आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री डाॅ भागवत कराड देखील उपस्थित होते. राज्याला कोरोनाच्या महामारीतून बाहेर काढण्यासाठी आपण काम करत आहोत, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“आपण सर्व भारतीय पंतप्रधान मोदींना हे गिफ्ट देऊयात”

‘हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’; संजय राऊतांचा इशारा

“इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याच्या पापात आम्ही सुद्धा भागीदार”

…म्हणूून आज मुंबईमध्ये महिलांसाठी होणार विशेष लसीकरण!

“PM मोदी आणि ICMR च्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More